*कोकण Express*
*कासार्डे प्रभाग चर्मकार समाजोन्नती मंडळाचे कार्य कौतुकास्पद*
*विद्यार्थ्यांचा गुणगौरव केल्याने त्यांना एक वेगळीच उर्जा प्राप्त होते.तालूकाध्यक्ष महानंद चव्हाण यांचे गौरवोदगार*
*कासार्डे;संजय भोसले*
बदलत्या काळानुरूप शिक्षण घेत असताना सध्या मुलांना हवी ती गोष्ट काही क्षणांमध्ये मिळते. पण त्या मिळालेल्या वस्तूचा योग्य तो वापर करून ज्ञानार्जन करणे हे जरी गरजेचे असले तरी ते ज्ञान मिळवत असताना योग्य मार्गाने आणि योग्य असेच मिळवून सर्वप्रथम आई-वडील व समाजाचे ऋण फेडण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. विद्यार्थ्याने अखेरपर्यंत ज्ञानाचे कण मिळवत राहून समृद्ध व्हावे. असे गौरव उद्गार कणकवली तालुका समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष महानंद चव्हाण यांनी काढले. ते कासार्डे विद्यालयाच्या डिजीटल हाॅलमध्ये आयोजित कासार्डे प्रभाग चर्मकार समाजउन्नती मंडळाने आयोजित केलेल्या दशक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावरून बोलत होते.ते पूढे म्हणाले की विद्यार्थ्यांचा गुण गौरव केल्याने त्यांना एक वेगळीच उर्जा प्राप्त होते.म्हणून असे गुणगौरव सोहळे होणे गरजेचे आहे.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून कासार्डे विकास मंडळाचे प्रभाकर कुडतरकर, चर्मकार समाजउन्नती मंडळाचे अध्यक्ष व कासार्डेचे पोलीस पाटील महेंद्र देवरुखकर ,उपाध्यक्ष संजय चव्हाण, सचिव संतोष जाधव, विभाग प्रमुख दत्ताराम जाधव, माजी अध्यक्ष रामचंद्र पाटणकर, खजिनदार विजय देवरुखकर, दारुम पोलीस पाटील संजय बिळसकर ,ज्येष्ठ नागरिक व सल्लागार प्रकाश कोतवडेकर, साळीस्ते पोलीस पाटील गोपाळ चव्हाण, तालुका कार्याध्यक्ष पंढरी जाधव, तालुका सचिव कणकवली आनंद जाधव, कासार्डे विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक संजय भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कासार्डे दशक्रोशीतील चर्मकार समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या जवळजवळ 14 विद्यार्थ्यांना शालेय भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व संत रविदास महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करण्यात आले व कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते मान्यवरांचे शाल ,श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दारुण पोलीस पाटील संजय बिळसकर यांनी मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम कथन करून पालकांनी आपल्या पाल्यावर उत्तम संस्कार करत असताना मोबाईलचा अतिरेकी वापर होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले. कोणत्याही पाल्याचे अति लाड करून ते पाल्य बिघडणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि समाजामध्ये घडणाऱ्या घटनांकडे डोळे उघडे ठेवून योग्य ती काळजी घ्यावी .आपले मूल कुठे वाम मार्गाला लागले नाही ना हे वेळीच ओळखून त्याला लगाम घालावा. तरच आपण घेत असलेल्या मेहनतीला काहीतरी अर्थ उरणार आहे असे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव संतोष जाधव यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक देवेंद्र देवरुखकर यांनी यांनी मानले तर महेंद्र देवरुखकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या गुणगौरव सोहळ्याला परिसरातून बहुसंख्य विद्यार्थी,पालक व समाजबांधव मोठ्या संख्येने हजर होते.