*कोकण Express*
*रस्ता खचल्याने करूळ घाट बंद*
*अवजड वाहनासाठी फोंडा मार्ग सुरू ; प्रशासनाची माहीती….*
*कणकवली ः प्रतिनिधी*
करूळ घाटातील रस्ता आणि बाजूची संरक्षक भिंत कोसळल्यामुळे तेथील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. ही घटना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत कणकवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांनी माहिती दिली आहे. दरम्यान प्रवाशांनी फोंडाघाट किंवा आंबोली पर्यायी मार्गाने प्रवास करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. याबाबतची माहिती मिळताच त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने पहारा ठेवला आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी त्या मार्गावर वाहतूक रोखली आहे. तसेच आंबोली व फोंडाघाट या पर्यायी मार्गाने जाण्याच्या सूचना केल्या जात आहे. रस्ता लवकरात लवकर सुरू व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून त्या ठिकाणी संबंधित यंत्रणेने धाव घेतली असल्याचे श्री. हुलावळे यांनी सांगितले.