*कोकण Express*
*सलग दोन दिवस अतिवृष्टीचा फटका ; आचरा रोड बंद*
कणकवली तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली आचरा मार्गावरील वाहतूक सकाळी एकदा व आता दुपारी 4 वाजता पूर्णतः ठप्प झाली. आचरा रोडवर बिडवाडी फाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पाणी आल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर उर्सुला शाळेजवळ देखील काही प्रमाणात पाणी भरले होते.