*कोकण Express*
*बावशी येथे कोसळलेल्या घराची आमदार नितेश राणे यांनी केली पाहणी…*
*कणकवली ःःप्रतिनिधी*
तालुक्यात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे बावशी गावातील सत्यवान मर्ये यांचे घर कोसळून सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले. दरम्यान याची तात्काळ दखल घेत आमदार नितेश राणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच तात्काळ मदत मिळवून देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या.
यावेळी तहसीलदार आर.जे. पवार, माजी पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, पंढरी वायंगणकर आदींच मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.