*कोकण Express*
*हिंदळे येथे महारक्तदान शिबिराला दशक्रोशीतून रक्तदाते सहभागी*
*स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माजी सभापती सुनील पारकर यांचे आयोजन*
*देवगड ः प्रतिनिधी*
देवगड तालुक्यातील हिंदळे ग्रामपंचायत कार्यालय येथे
देवगड पंचायत समिती माजी सभापती सुनील भाई पारकर यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष निमित्ताने महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते,
छत्रपती शिवाजी महाराज कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोस, उद्यान विद्या मुळदे यांच्या संयुक्त विद्यमाने महा रक्तदान शिबिर पार पडले,
या महा रक्तदान शिबिरामध्ये कुणकेश्वर,मिठबांव, दहिबांव,कातवण,नारिंग्रे,
तांबळडेग,पोयरे,मशवी,बागमळा, हिंदळे मोर्वे,मुणगे खुडी आदी गावातील रक्तदाते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,
या शिबिराचे उद्घाटन देवगड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रवींद्र राठोड यांच्या शुभहस्ते करण्यात आले,
यावेळी हिंदळे ग्रामपंचायत सरपंच स्वरा पारकर,मिठबांव ग्रामपंचायत सरपंच भाई नरे,देवगड पंचायत समिती माजी सभापती सुनीलभाई पारकर,
माजी शिक्षण आरोग्य सभापती सावी लोके,गोविंद सावंत,मनोज जाधव,दयानंद तेली,उदय हिंदळेकर, शाम कदम, निलेश कुंभार, राजेंद्र (बाळा) राणे, कंकाद्रीक लोणे,निखिल तारी, सुभाष तेली,मकरंद शिंदे, शेखर राणे, पूनम मयेकर, निवेदिता फाटक,
संजीव बांबूळकर,सुनिल मेस्त्री,राजू प्रभु,परेश रुमडे,सुनील बापट,ग्रामसेविका भुजबळ,
दाभोळकर ( आरोग्य सेवक)
श्रीमती चव्हाण ( आरोग्य सेविका)
श्रीमती निर्झरा ( मदतनीस)
श्रीमती अनुष्का राणे ( आशा)
डॉ. सांभाजी वाघमोडे
अनिकेत घाडी आदींसह
छत्रपती शिवाजी महाराज कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोस, उद्यान विद्या मुळदेचे विद्यार्थी उपस्थित होते