*कोकण Express*
*सिंधुदुर्गच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदी औंद येथील डाँ. अशोक नांदापूरकर*
*सिंधुनगरी | प्रतिनिधी*
पुणे औंद येथील डाँ अशोक नांदापुरकर यांची सिधुदुर्गच्या जिल्हा शल्य चिकित्सक पदी शासनाने नियुक्ती केली. गेली दोन वर्ष या पदाचा अतिरिक्त कार्यभार डाँ श्रीपाद पाटील यांनी सांभाळला होता. मध्यतरीच्या काळातील जिल्हारुग्णालयातील रुग्णसेवा व डाँक्टर्स नर्सेस व अन्यकर्मचार्यामधील वाद व त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजप नेते माजी खास. निलेश राणे, आम. नितेश राणे यांनीही लक्ष घालत रुग्णसेवा सुरळीत केली होती. दरम्यान ठाकरे सरकारच्या काळात प्रशासनातील अधिकार्याच्या बदल्या बढत्या तसेच अधिकार्यांचा पदाचा गैरवापर करुन झालेल्या कारवायांची दखल शिंदे फडणवीस सरकारने घेतली आहे. तत्कालीन ठाकरे सरकारच्या भरवशावर काही अधिकार्यांनी महत्वाच्या पदावरील नियुक्ती साठी केलेले ‘सेटींग’ आता सरकार बदल्याने फिसकटले आहे त्यामुळे संबधीत अधिकारी अडचणीत आल्याचीही चर्चा अधिकारी गोटात आहे. याच काळात काही पोलीस अधिकार्यांनीही पदाचा गैरवापर केला असून त्याचीही दखल विद्यमान सरकारने घेतली आहे.
या जिल्हा रुग्णायाच्या कारभारभाराबाबत व त त्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक श्रिमंत चव्हाण यांच्या वादग्रस्त कारकिर्दीमूळे नागरिकांच्या रुग्णसेवेवर त्याचा मोठा परिणाम झाला होता. त्यांची अटक व नंतर कारवाई व बदली या मुळे जिल्हा रुग्णालय सर्वाचेच लक्ष बनले होते. त्यानंतर डाँ श्रिपाद पाटिल यांच्याकडर या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवीण्यात आला होता. जिल्हा रुग्णालयातील मागिल बेशिस्त कारभार सुधारण्याचा डाँ पाटील यांनी प्रयत्न केला, व अनेक तक्रारी मार्गी लावल्या. आम नितेश राणे व भाजप नेते माजी खास निलेश राणे यांनीही यात लक्ष घालत अनेक कत्रांटी कर्मचार्यांचे प्रश्न तसेच नागरिकाच्या रुग्ण सुविधा व डाँक्टर्स नर्सेस व अन्य रुग्णालयीन कर्मचार्यांमधील मतभेद सोडवीले होते. त्यामुळे रुग्णसेवा व या रुग्णालयाचा कारभार सुरळीत होण्यास मदत झाली होती.