*कोकण Express*
*कणकवली न.पं.कडून शिंदे गटाचा बॅनर पुन्हा हटवला…!
*शिंदे गटच्या भूमिकेकडे लक्ष…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या वरील हल्ल्याच्या निषेधाचा शिवसेना शिंदे गटाने बॅनर लागला होता.मात्र,शिंदे गट लिहलेला स्टीकर काढल्यामुळे शिवसेना सिंधुदुर्ग असा बॅनर झाला होता. अखेर नगरपंचायत प्रशासनाने हा बॅनर १२ वाजता पुन्हा हटवला आहे.
यापूर्वी नगरपंचायतने हा बॅनर हटवला होता. त्यावेळी रीतसर फी भरून हा बॅनर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यात आला होता. मात्र काल रात्री या बॅनर वरील शिंदे गट हा स्टिकर काढल्यानंतर हा बॅनर आज पुन्हा हटवण्यात आला. नगरपंचायत पथकाद्वारे हा बॅनर नगरपंचायत मध्ये नेण्यात आला.यावर काय शिंदे गटाची काय प्रतिक्रिया उमटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कणकवली न.पं.कडून शिंदे गटाचा बॅनर पुन्हा हटवला…!
शिंदे गटच्या भूमिकेकडे लक्ष…!
कणकवली – अनिकेत उचले : कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या वरील हल्ल्याच्या निषेधाचा शिवसेना शिंदे गटाने बॅनर लागला होता.मात्र,शिंदे गट लिहलेला स्टीकर काढल्यामुळे शिवसेना सिंधुदुर्ग असा बॅनर झाला होता. अखेर नगरपंचायत प्रशासनाने हा बॅनर १२ वाजता पुन्हा हटवला आहे.
यापूर्वी नगरपंचायतने हा बॅनर हटवला होता. त्यावेळी रीतसर फी भरून हा बॅनर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यात आला होता. मात्र काल रात्री या बॅनर वरील शिंदे गट हा स्टिकर काढल्यानंतर हा बॅनर आज पुन्हा हटवण्यात आला. नगरपंचायत पथकाद्वारे हा बॅनर नगरपंचायत मध्ये नेण्यात आला.यावर काय शिंदे गटाची काय प्रतिक्रिया उमटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.