*कोकण Express*
*अतिवृष्टीमुळे बावशीत घर कोसळले…*
*आतील तीनही व्यक्ती सुरक्षित*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बावशी येथील सत्यवान मर्ये यांचे राहते घर आज सकाळी कोसळले. मात्र घरातील तिनही व्यक्ती सुरक्षित आहेत. त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती कणकवली तहसीलदार आर.जे पवार यांनी दिली. घर कोसळल्याने मर्ये यांचे २ लाख १० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.