*कोकण Express*
*दिवा एक्सप्रेस मधून कोसळली ; दोन दिवसांनी मिळाला युवतीचा मृतदेह…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मुंबईहून दिवा सावंतवाडी रेल्वेतुन कुडाळ तालुक्यात तेरसेबांबार्डे येथे जात असताना २५ वर्षीय युवती अचानक बेपत्ता झाल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. या बाबत त्या युवतीच्या वडिलांनी ओरस पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता ची खबरही दिली. मात्र दिवा – सावंतवाडी रेल्वेतून कुडाळला वडिलांसह जाणारी ती युवती कणकवली तालुक्यातील बोर्डवेदरम्यान रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांनी उघडकीस आली. वैजयंती दत्ताराम सावंत (वय २५) रा.तेरसेबांबर्डे असे त्या मृत झालेल्या युवतीचे नाव आहे. ती युवती आपल्या वडिलांसह मुंबईहून गावी कुडाळला घरी परतत होती. बुधवारी दिवा सावंतवाडी रेल्वेने ती व तिचे वडील दिवा रेल्वेतून येत असताना मुलीचे वडील हे बोगीतील स्वच्छतागृहामध्ये गेले होते. त्यापूर्वी कणकवली रेल्वे स्थानकापर्यंत यांची मुलगी त्या बोगीमध्ये होती. या दरम्यान ती युवती अचानक गायब झाली. तिच्या वडिलांनी तिचा रेल्वेमध्ये सर्वत्र शोधही घेतला. परंतु ती आढळली नाही. ओरोस मध्ये उतरल्यानंतर त्यांनी याबाबत ओरोस पोलीस स्टेशन मध्ये नापत्ता खबर दिली. मात्र गेले दोन दिवस त्या युवतीचा शोध लागत नव्हता. दरम्यान त्या युवतीचा मृतदेह कुजू लागल्याने वास येऊ लागला असताना रेल्वे गस्तीला असलेल्या ट्रॅकमनने बोर्डवे नजीकच्या रेल्वे ट्रॅक लगतच्या झाडीत पाहिले असता एका तरुणीचा मृतदेह असल्याचे आढळले. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती दिली. ओरोस पोलीस स्टेशन मध्ये नापत्ता खबर असलेल्या युवतीशी या मृत्यू झालेल्या युवतीचे वर्णन जुळत असल्याने त्या युवतीच्या नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली. खात्री केल्यानंतर त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक देसाई, व महिला पोलीस कुंभार आदींनी घटनास्थळी धाव घेत त्या तरुणीचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. याबाबत याबाबत रेल्वे पोलीस विपुल मस्के यांनी खबर दिली आहे. त्यानुसार पोलिसात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.