रेल्वे फाटक बंद पडल्याने दोन तास वाहतूक ठप्प

रेल्वे फाटक बंद पडल्याने दोन तास वाहतूक ठप्प

*कोकण Express*

*रेल्वे फाटक बंद पडल्याने दोन तास वाहतूक ठप्प*

*कणकवली तालुक्यातील साकेडी येथील घटना*

कणकवली ः प्रतिनिधी*

 कणकवली तालुक्यातील साकेडी येथील रेल्वे फाटक बंद पडल्याने शुक्रवारी सायंकाळी सव्वा पाच वाजल्यापासून जवळपास दोन तासाहून अधिक काळ रेल्वे फाटक बंद राहिल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. महामार्गावरून साकेडी मार्गे नागवे, करंजे, हरकूळ आदी भागांमध्ये जाणारी वाहने या रेल्वे फाटकांत दोन तासाहून अधिक काळ अडकून पडली होती. सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास या रेल्वे फटका चा वायर रोप तुटल्याने हे फाटक बंद झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर याबाबत रेल्वे तांत्रिक विभागाला गेटमन यांच्याकडून माहिती देण्यात आली. त्यानंतर नांदगाव हुन या संदर्भातील तांत्रिक कर्मचारी दाखल झाल्यानंतर हा वायर रोप जोडून रेल्वे फाटक पूर्ववत करण्यात आले. मात्र या कालावधीत अनेक वाहने या रेल्वे फाटकातच अडकून पडल्याने सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागला. कोकण रेल्वे मार्गावर असलेल्या रेल्वे फटकांची नियमित डागडुजी केली जाते. मात्र सदर फाटकाचा वायर रोप तुटेपर्यंत याकडे दुर्लक्ष कसा झाला? असा देखील प्रश्न सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. हा वायर रोप तुटण्यापूर्वीच जर बदलला गेला असता तर जनतेला हा त्रास झाला नसता. दरम्यान दोन तासानंतर या मार्गावरून थांबलेली वाहतूक पूर्ववत झाली. मात्र तोपर्यंत कणकवली हुन कामधंद्यावरून घरी आलेल्या नागरिकांना मात्र रेल्वे फटकातच वाहने ठेवून ताटकळत राहावे लागले होते. तर काहींना हुंबरट मार्गे असलेल्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!