*कोकण Express*
*कोळोशी सजेवर कायमस्वरुपी तलाठी नेमणूक करा…*
*असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांची तहसिलदार आर.जे.पवार यांच्याकडे मागणी..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील कोळोशी सजा अंतर्गत असलदे हे
गाव येत आहे. सध्या आमच्या सोसायटी मार्फत पिक कर्ज उचल करण्यासाठी शेतऱ्यांच्या सातबा-यांवर “ई करार” बोजा नोंदविण्यासाठी आमच्या संस्थेमार्फत पत्र दिली जात आहेत. आमच्या संस्थेचे सुमारे ५० नवीन कर्जदार आहेत. त्या शेतक-यांना तलाठी कार्यालयात प्रभारी तलाठी असल्यामुळे अडचणी येत आहेत.तरी तातडीने कायमस्वरुपी तलाठी द्यावा,अशी मागणी चेअरमन भगवान लोके यांनी तहसीलदार आर.जे.पवार यांच्याकडे केली आहे.
आता प्रभारी तलाठी असलेले
तलाठी पुढील १५ दिवस सुट्टीवर आहेत, असे समजले.शेतक-यांच्या सातबा-यावर ई – करार बोजा नोंद होणे आवश्यक आहे. तलाठी नसल्यास आमच्या शेतक-यांना सदर ई – करार नोंदी करता येणार नाहीत.त्यामुळे पुढील काळात आमच्या सोसायटी मार्फत शेतक-यांना कर्ज उचल देता येणार नाही. त्यामुळे कोळोशी सजेवर तातडीने कायमस्वरुपी तलाठी नेमणुक अशी मागणी असलदे रामेश्वर विविध कार्यकारी विकास सोसायटी यांच्यावतीने चेअरमन भगवान लोके यांनी केली आहे.