*कोकण Express*
*युवासेना उपतालुका प्रमुखपदी रोहित भोगटे*
युवासेना उपतालुका प्रमुखपदी कुडाळ शहरातील रोहित भोगटे यांची निवड करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक यांनी आज याची कुडाळ शिवसेना शाखेत घोषणा केली. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी रोहित भोगटे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,
उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, संतोष अडुळकर, राजू कविटकर, राजू गवंडे, रुपेश पावसकर, सचिन काळप, संजय भोगटे आदी उपस्थित होते.
युवासेना उपतालुका प्रमुख पदी रोहित भोगटे यांची निवड झाल्याने कुडाळ शहरासह तालुक्यात युवासेना आणखी मजबूत होणार आहे. रोहित भोगटे हे माठेवाडा, गांधी चौक, प्रभावळकर वाडा या भागात सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.