*कोकण Express*
*आंबोलीत ढगफुटी धबधबे रस्त्यावर ; पोलिसांनी वाहतूक थांबवली*
*सदृश्य पावसाने काही भागात पाण्याची पातळी वाढली*
*सावंतवाडी ःःप्रतिनिधी*
आंबोली येथील ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे छोट्या धबधब्याचे पाणी थेट रस्त्यावर कोसळत आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सावंतवाडी – आंबोली मार्गावरील वाहतूक थांबवली आहे. तर दुसरीकडे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात तेरेखोल नदीत आल्यामुळे माडखोल विलवडे सह बांदा येथे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे .या पार्श्वभूमीवर संबंधित गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहावे असे आवाहन बांदा गावचे सरपंच अक्रम खान व माडखोल गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊ कोळमेकर यांनी केले आहे. तर पाऊस कमी होईपर्यंत आंबोली घाटातील वाहतूक रोखण्यात आली आहे. असे तेथील आंबोली पोलीस हवालदार दत्ता देसाई यांनी सांगितले. आंबोली परिसरात गेल्या चार तासापासून ढगफुटी सदृश्य पाऊस पडत आहे संततधार कोसळत असल्यामुळे घाटातील छोट्या धबधब्याचे पाणी रस्त्यावर कोसळत आहे .याबाबतची माहिती काही वाहनधारकांकडून देण्यात आल्यानंतर आंबोली पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन खात्री केली व कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर बांदा ग्रामपंचायत व प्रशासन अलर्ट झाले असल्याचे तेथून सांगण्यात आले