६ ऑगस्ट रोजी रानभाज्या प्रदर्शन व रानभाज्या पाककला स्पर्धेचे आयोजन

६ ऑगस्ट रोजी रानभाज्या प्रदर्शन व रानभाज्या पाककला स्पर्धेचे आयोजन

*कोकण Express*

*६ ऑगस्ट रोजी रानभाज्या प्रदर्शन व रानभाज्या पाककला स्पर्धेचे आयोजन…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेज कणकवलीच्या आय. क्यू. ए. सी., व सायन्स असोसिएशन आणि स्नेह सिंधु कृषी पदवीधर संघ, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रानभाज्या महोत्सव २०२२’ अंतर्गत रानभाज्या प्रदर्शन व रानभाज्या पाककला स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक ६ ऑगस्ट २०२२रोजी कणकवली कॉलेज, कणकवली येथे केले असून विद्यार्थी व नागरीकांनी याचा लाभ घ्यावा असे प्राचार्य, कणकवली कॉलेज, कणकवली व अध्यक्ष, स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघ सिंधुदुर्ग यांनी आवाहन केले आहे.

रानभाज्या प्रदर्शन व रानभाज्या पाककृती स्पर्धा आयोजन प्रथमच कणकवली कॉलेज, कणकवली व स्नेह सिंधुकृषी पदवीधर संघ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने होत असून यामध्ये सिंधुदुर्गमध्ये सापडणा-या साठ रानभाज्या, त्याच्या पाककृतीची माहिती फोटोसह प्रदर्शनात मांडण्यात येईल. अशा प्रकारचे प्रदर्शन प्रथमच होत असून त्याचा विद्यार्थी, पालक, शिक्षक व इतर नागरीकांना लाभ होईल. याबरोबरीनेच रानभाज्या पाककला स्पर्धेचे आयोजन केले असून त्यामध्ये गृहिणी, व बचत गटांच्या महिलांना त्याच्या पाकालेला वाव मिळावा, रानभाज्यांच्या पारंपारिक पाककृती, त्यांची वैशिष्ट्ये व आयुर्वेदिक किंवा स्थानिक वैद्यकीय परंपरेनुसार औषधी गुणधर्म व पौष्टिकता समजावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. पाककला स्पर्धेतील विजेते प्रथम, द्वितीय व तृतीय आणि उत्तेजनार्थ आलेल्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके व प्रमाणपत्र दिली जातील.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात रानभाज्यामध्ये असणारे पौष्टिक घटक, उपयुक्त रासायनिक घटक, औषधी गुणधर्म व रानभाज्यांचे आहारातील अन्यन साधारण महत्त्व याबाबत प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य निलेश कोदे यांचे व्याख्यान आयोजित केले असून या महत्त्वपूर्ण व्याख्यानास उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य कणकवली कॉलेज, कणकवली व अध्यक्ष स्नेह सिंधु कृषी पदवीधर संघ सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

रानभाज्या पाककला स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी लागणा-या प्रवेशिका कणकवली कॉलेज, कणकवली येथे उपलब्ध असून संपर्काकरीता प्रा. प्रियांका लोकरे मो. नं. 7743975533 व प्रा. पूजा सुतार मो. नं. 8308263778 या नंबरवर संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा.

स्नेह सिंधु द्वारा विजयश्री अॅग्रो, सह्याद्री हॉटेलच्या शेजारी, कणकवली येथे संपर्क संदिप राणे मो. पूजा 9420306306, 9890874779 व डी. आर. परब मो. नं. 9422596621, 9307872328 याना संपर्क करावा. तसेच कणकवली बाजारपेठ येथे अशोक करंबेळकर यांच्या पेपर स्टॉलवर स्पर्धा प्रेवशिका उपलब्ध आहेत.

या पाककला स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले, समन्वयक डॉ. बी. जी. गावडे, डॉ. तेजस जयकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!