कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी एसटी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्यावर कारवाई करा!

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी एसटी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्यावर कारवाई करा!

*कोकण Express*

*कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी एसटी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्यावर कारवाई करा!*

*भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांची एसटी महामंडळ व्यवस्थापकांकडे मागणी*

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधत तक्रार करून देखील कारवाई करत नसल्याने कणकवली विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्या विरोधात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई करा अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापक माधव काळे व व्यवस्थापकीय संचालक व महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात श्री मेस्त्री यांनी म्हटले आहे, गितेश कडू हे महाराष्ट्र राज्य परिवहनमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत . तसेच ते सिंधुदूर्ग जिल्हा युवासेना जिल्हाध्यक्ष या पदावर देखील कार्यरत आहेत. असे असताना , ते विविध राजकीय कार्यक्रमांमध्ये भाग घेत असतात. ते पक्षाच्या विविध राजकीय , सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय देखील असतात. आमदार नितेश राणे यांनी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्याबाबतीत केलेल्या वक्तव्याबाबत सदर वक्तव्याचा निषेध करतानाची गितेश कडू यांची बातमी प्रसिद्ध झालेली होती. तसेच भविष्यात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणूकांबाबत देवगड येथील तालुका युवासेनेच्या सभेतदेखील त्यांनी भाग घेतलेला होता. २३ जानेवारीचे औचित्य साधून युवासेना गडकिल्ले स्वच्छता मोहीम राबविणार आहे , अशी देखील बातमी प्रसिद्ध झालेली होती . शिवसेना जिल्हा युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबत बातमी प्रसिद्ध झालेली होती . त्यामध्ये शिवसेना पक्षाद्वारे गितेश कडू यांची कणकवली मतदार संघाकरीता नियुक्ती झालेली होती. गितेश कडू यांनी यापूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत असताना अनेक राजकीय कार्यक्रमात भाग घेतला असल्याने त्यांच्याविरुद्ध यापूर्वी तक्रारी देखील करण्यात आलेल्या असून, त्यामध्ये त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता विनाकारण सदर तक्रारी प्रलंबित ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच गितेश कडू यांच्यावर कारवाई व्हावी याकरीता लाक्षणीक उपोषण देखील करण्यात आलेले होते. त्याबाबतच्या तक्रारी राज्य परिवहन सिंधुदूर्ग विभाग यांच्याकडे वेळोवेळी करण्यात आलेली होती .महाराष्ट्र राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना राजकारणात भाग घेण्यास अथवा निवडणूक लढविण्यासाठी परवानगी देण्याबाबतच्या प्रश्नावर महामंडळ ठराव क्र.९ १ : ०:०७ दि .२ ९ .० ९ .१ ९९ १ घेतलेल्या निर्णयानुसार सुचना दिलेल्या आहेत. त्यामधील परिपत्रक क्र .५४ / २००१ नुसार , “ रा.प.कर्मचाऱ्यांनी सेवेचा राजीनामा न देता राजकारणात भाग घेतला आहे. अथवा एखादी राजकीय निवडणूक लढविली आहे हे सिद्ध झाल्यास त्यांच्यावर शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार कारवाई करण्यात यावी. असे स्पष्टपणे सदर पत्रकात नमूद केलेले आहे. तसेच या पार्श्वभूमिवर रा.प. कर्मचाऱ्यांनी राजकारणात भाग घेतला आहे अथवा संसद / विधान मंडळे , जिल्हापरिषद , नगरपरिषद , ग्रामपंचायत इ . राजकीय निवडणूक लढविली आहे , हे सिद्ध झाल्यास त्यांच्यावर प्रमादीय कारवाईची कार्यवाही करताना त्यांना , “ रा.प. सेवेतून कमी करणे , बडतर्फ करणे हिच शिक्षा अपेक्षित आहे. ” असे नमूद करण्यात आलेले आहे . असे असतानादेखील , राज्य परिवहन महामंडळाचे वरीष्ठ अधिकारी यांनी गितेश कडू यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. राज्य परिवहन महामंडळाचे सिंधुदूर्गातील वरीष्ठ अधिकारी हे जाणीवपूर्वक हेतूपुरस्कर गितेश कडू यांच्यावर परिपत्रकात नमूद असल्याप्रमाणे कारवाई करण्यास विलंब करत आहेत. एसटी चे विभाग नियंत्रक आपले कर्तव्य पार पाडण्यात कसुरी व विलंब करत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे . तरी वर नमूद तरतुदींचा विचार करता , गितेश कडू यांच्या वर कारवाई करण्यास कसुरी केल्याबद्दल विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्याविरुद्ध भा.द.वि.कलम २१७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा . अशी मागणी मिलिंद मेस्त्री यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!