*कोकण Express*
*आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी कणकवली तहसीलदार कार्यालयास दिली भेट*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त जिल्हा प्रशासन नियोजन करत आहे.कणकवलीत झेंडा वाटप जनजागृती अभियान शुभारंभ कणकवली पंचायत समिती येथे पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी कणकवली तहसीलदार कार्यालयाला भेट दिली.कणकवली तहसीलदार कार्यालय परिसर स्वच्छतेचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी कौतुक केलं आहे.
यावेळी पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर,उपमुख्यकार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे,प्रांताधिकारी वैशाली राजमाने,तहसीलदार आर.जे.पवार,गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,नायब तहसीलदार शिवाजी राठोड, मंडळ अधिकारी पाटील आदींसह महसूल कर्मचारी उपस्थित होते.