*कोकण Express*
*तळेरेत प्रथमच नारळीपोर्णिमे निमित्त भव्य नारळ लढवणे स्पर्धेचे आयोजन*
*कासार्डे;संजय भोसले*
बाजारपेठ मित्रमंडळ तळेरे आयोजित खास नारळी पौर्णिमेनिमित्त प्रथमच भव्य नारळ लढविणे स्पर्धा तळेरे बाजारपेठ येथे गुरुवार दि.११ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ठीक २.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
प्रथम क्रमांक विजेत्याला रोख रुपये ५००१/- (नागेश पाळेकर व शिवम खटावकर पुरस्कृत) तर द्वितीय क्रमांक- ३००१/- (सचिन बंडू पाटील पुरस्कृत) अशी रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
तरी इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे लवकरात लवकर नोंदवावीत.
पहिल्या ६४ स्पर्धकांना प्राधान्य दिले जाईल व स्पर्धक वाढल्यास आणखीन ८ स्पर्धकांना संधी दिली जाईल. या स्पर्धेसाठी २००/- रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे.स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना मंडळाकडून पाच नारळ देण्यात येणार आहेत.
तरी इच्छुक स्पर्धकांनी स्वप्नील कल्याणकर – ९४२०४६९००५ किंवा
आप्पा कल्याणकर – ९९६००५११९६ यांच्याकडे आपली नावनोंदणी करावी असे आवाहन बाजारपेठ मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.