भारतीय बौद्धमहासभा र.न.3227 शाखा सिंधुदुर्गच्या वतीने सेवानिवृत्तांचा व सोनाली कदम हिचा 07 आॅगस्ट रोजी भव्य सत्कार होणार

भारतीय बौद्धमहासभा र.न.3227 शाखा सिंधुदुर्गच्या वतीने सेवानिवृत्तांचा व सोनाली कदम हिचा 07 आॅगस्ट रोजी भव्य सत्कार होणार

*कोकण Express*

*भारतीय बौद्धमहासभा र.न.3227 शाखा सिंधुदुर्गच्या वतीने सेवानिवृत्तांचा व सोनाली कदम हिचा 07 आॅगस्ट रोजी भव्य सत्कार होणार*

*कासार्डे : संजय भोसले*

दी बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा ( र. नं. ३२२७ ) राष्ट्रीय अध्यक्ष आद . राजरत्न अशोकराव आंबेडकर , शाखा – सिंधुदुर्ग या संस्थेच्यावतीने जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करून प्रशासकीय ,अथवा शिक्षण सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या आद . मिलिंद जाधव ( सेवानिवृत गट विकास अधिकारी ) , आद . सुर्यकांत बिंबवणेकर( सेवानिवृत्त मुख्याध्यापक) , आद . सौ . श्रद्धा कदम ( सेवानिवृत शिक्षिका ) , तसेच एम . पी . एस .सी . ही स्पर्धा परीक्षा अथक परिश्रमातून उत्तीर्ण होणाऱ्या बेळणे ता. कणकवली गावच्या सुकन्या कु .सोनाली कदम आदींचा सत्कार करून गौरवण्यात येणार आहे . सदर कार्यक्रम दि . ७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतपेढी सभागृह येथे संस्थेचे जिल्हाध्यक्ष आद . विद्याधर कदम यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून प्रमुख अतिथी म्हणून आद . हेमंतकुमार तांबे ( सचिव कोकण विभाग ) , आद . राजेंद्र कदम ( उपाध्यक्ष, पर्यटन , कोकण विभाग ) . उपस्थित राहणार आहेत . असे संस्थेचे जिल्हा महासचिव आद . ए . डी . कांबळे यांनी कळविले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!