*कोकण Express*
*उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला,पुण्यात मोठा गदारोळ*
*पुणे दि.०२-:*
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांसोबत पुणे दौऱ्यावर आहेत. या दरम्यान उदय सामंत यांच्या गाडीवर कात्रज चौकात शिवसैनिकांनी हल्ला केला. शिवसैनिकांनी गाडीच्या काचेवर जोरजोरात हात मारून काचा फोडल्या, अशी माहिती समोर आली आहे.