*कोकण Express*
*आ.नितेश राणेंकडून जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवींचे वाढदिवस अभिष्टचिंतन*
*ओरोस ः प्रतिनिधी*
जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार नितेश राणे यांनी खास अभिष्टचिंतन केले. जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्यावर वाढदिनी सहकार, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, औद्योगिक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ओरोस येथील प्रधान कार्यलयात अध्यक्ष दळवी यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. आ. नितेश राणे यांनी मनिष दळवी यांची भेट घेत सदिच्छा दिल्या. यावेळी जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, बाबा परब, प्रकाश मोर्ये, सरव्यवस्थापक अनिरुद्ध देसाई आदी उपस्थित होते.