कोंशल्य विकास योजनेअंतर्गत केक,मेणबत्ती व अगरबत्ती अद्यावत विनामूल्य प्रशिक्षणाचां लाभ व्यावसायिकांनी घ्यावा

कोंशल्य विकास योजनेअंतर्गत केक,मेणबत्ती व अगरबत्ती अद्यावत विनामूल्य प्रशिक्षणाचां लाभ व्यावसायिकांनी घ्यावा

*कोकण Express*

*कोंशल्य विकास योजनेअंतर्गत केक,मेणबत्ती व अगरबत्ती अद्यावत विनामूल्य प्रशिक्षणाचां लाभ व्यावसायिकांनी घ्यावा*

*सौ वैष्णवी मोंडकर अध्यक्ष मातृत्ववरदान फाउंडेशन*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वयंरोजगाराच्या माध्यमातून जिल्ह्याच्या स्थानिक व्यावसायिकांस रोजगार निर्मितीचे साधन उपलब्ध व्हावे या उद्धेशाने मातृत्ववरदान फाऊंडेशन व पर्यटन व्यावसायिक महासंघ च्या माध्यमातून मेणबत्ती व अगरबत्ती बनविणे विषयी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले असून सदर प्रशिक्षण हे विनामूल्य असून यामध्ये मार्केटिंग ,कच्चामाल बनविणे माहिती ,प्रात्यक्षिक तसेच यातील स्थानिक व राष्ट्रीय मार्केट मध्ये विक्री होणारे प्रकार ,ब्रँड डेव्हलपमेंट आकर्षक पॅकेजींग,मार्केट सर्वे याचें प्रशिक्षण दिले जाणार असून व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय कर्ज सुविधा अनुदान याविषयी माहिती दिली जाणार असून सदर प्रशिक्षण शिबीर हे १६ ऑगस्ट २०२२ पासून हॉटेल श्री महाराज मालवण येथे आयोजित करण्यात आले असून दहा दिवसांचा कालावधी राहणार असून या मध्ये जेवण व नाष्टा व प्रशिक्षण फी पूर्ण पणे मोफत असून हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर शासकीय सटिफिकेट देण्यात येणार आहे .तसेच रविवार ७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० ते ५ वेळेत हॉटेल श्री महाराज येथे एडव्हांस केक बनविण्याचे शिबीर घेण्यात येणार असून या मध्ये रेड वेलवेट केक,शिमर केक ,पिनाटा केक,जीओड केक,पुल मी अप केक व
व्हेज व नॉनव्हेज स्लाईस केक यांचे प्रशिक्षण दिले जाणार असून या सर्व प्रशिक्षणासाठी इच्छूक व्यक्तींनी आपली नावे
82751 06375 या व्हॉट्सअप नंबरवर किंवा हॉटेल श्री महाराज मालवण येथे नाव नोंदणी करावी असे आवाहन मातृत्ववरदान फाउंडेशन अध्यक्ष सौ.वैष्णवि मोंडकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!