फोंडाघाट कॉलेज मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त मनविसे युनिटची स्थापना आणि युनिट फलकाचे अनावरण

फोंडाघाट कॉलेज मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त मनविसे युनिटची स्थापना आणि युनिट फलकाचे अनावरण

*कोकण Express*

*फोंडाघाट कॉलेज मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त मनविसे युनिटची स्थापना आणि युनिट फलकाचे अनावरण*

*फोंडाघाट ःःप्रतिनिधी* 

आज सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट कॉलेज मध्ये तरुणाईचा उदंड उत्साह, प्रचंड जल्लोष पहायला मिळाला. महाविद्यालयांचा परिसर मनसेमय- मनविसेमय झाला.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थी सेना अध्यक्ष श्री.अमितजी ठाकरे यांच्या आदेशाने तसेच सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष निलेश मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली फोंडाघाट महाविद्यालय येथे आज सोमवार दिनांक १ ऑगस्ट रोजी सकाळी मनविसे युनिटची स्थापना आणि युनिट फलकाचे अनावरण सिंधुदुर्ग,रत्नागिरी संपर्क अध्यक्ष श्री.अमोल साळुंके साहेब यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी पक्षाचे उपजिल्हा अध्यक्ष दया मेस्त्री साहेब,मनविसेचे पदाधिकारी आणि खूप मोठ्या संख्येने महाविद्यालयीन तरुण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!