*कोकण Express*
*युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे सिंधुदुर्गात आगमन*
*चिपी विमानतळावर आ. वैभव नाईक यांच्यासह शिवसेना नेते व शिवसैनिकांनी केले जंगी स्वागत*
निष्ठा यात्रेनिमित्त शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे आज सिंधुदुर्गात आगमन झाले. चिपी विमानतळावर आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना नेते व शिवसैनिकांकडून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, माजी जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे,युवासेना सहसचिव सिद्धेश धाऊसकर, मौसिम शेख, विस्तारक हेमंत दुधवडकर, शाखा अधिकारी मयूर कदम, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, मंदार शिरसाट,युवासेना जिल्हा समन्वयक गीतेश कडू,राजू राठोड, राजू गवंडे, अवधूत मालवणकर, हर्षद गावडे, रुपेश पावसकर, सुयोग खुल्ल्ली,पंकज शिरसाट, आदित्य सापळे, बाळू परब,सिद्धेश राणे, उत्तम लोके, आबू मेस्त्री आदिसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.