*कोकण Express*
*कु.प्रणय राणे भविष्यात राज्यस्तरीय स्पर्धेत खेळेल-श्री.वामन तर्फे*
*सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने अभिनंदन*
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपुत्र, कणकवली, जानवली गावचा रहिवाशी, जानवली येथील सामाजिक कार्यकर्ते आणि कणकवली एस् टी आगाराचे वाहतूक नियंत्रण श्री. विनय राणे यांचे चिरंजीव कु. प्रणय राणे याची प्रो कबड्डी 9व्या पर्वा साठी यु मुंबा संघात एन वाय पी कॅटेगरी मधून निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने त्याच्या घरी जाऊन अभिनंदन करुन सत्कार करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. वामन तर्फे, असरोंडी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सुशांत पाटील सर, शिवडाव हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. मसवेकर सर, फोंडा हायस्कूलचे क्रिडा शिक्षक श्री. देठे सर, प्रणयचे वडील श्री. विनय राणे उपस्थित होते. यावेळी प्रणयचे कौतुक करुन उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. या यशापर्यंत जाण्यासाठी केलेल्या खडतर प्रयत्नाबद्दल कु. प्रणयने माहिती दिली. भविष्यात प्रणय राज्यस्तरीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डी खेळेल अशी आशा श्री. वामन तर्फे यांनी व्यक्त करताना त्याच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याला अभिमान असल्याचे सांगितले. कु. प्रणयने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. त्याच्या यशात त्याच्या प्रशिक्षकांबरोबरच आई-वडिलांचेही श्रेय असल्याचे प्रणयने सांगितले.