*कोकण Express*
*फोंडाघाट ग्रामपंचायत ची ओबीसी आरक्षण सोडत जाहीर*
*प्रस्थापित अन्य वार्ड शोधण्याच्या मार्गावर*
*फोंडाघाट ःःप्रतिनिधी*
फोंडाघाट ग्रामपंचायतची ओबीसी आरक्षण सोडत, छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पिठासन अधिकारी रामचंद्र लक्ष्मण शिंदे–विस्तार अधिकारी ( ग्रा. पं.) ,पं.स., कणकवली यांचे मार्गदर्शनाखाली फोंडाघाट केंद्रशाळेची विद्यार्थिनी, कुमारी रावी सावंत (इयत्ता तिसरी) हीचे हस्ते काढण्यात आली. यावेळी फोंडाघाट ग्राम विस्तार अधिकारी वि.ज. कोलते आणि ग्रामपंचायतचे कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत होंडा घाट ग्रामपंचायत ओबीसी आरक्षण सोडत पार पडली
यामध्ये वार्ड क्रमांक १/२/४ (प्रत्येकी तीन जागा) –१) सर्वसाधारण स्त्री २)नामाप्र स्त्री ३) सर्वसाधारण. वार्ड क्रमांक.३– (जागा २)- १) सर्वसाधारण स्त्री. २) सर्वसाधारण. वार्ड क्रमांक -५ (तीन जागा) — १)सर्वसाधारण स्त्री २)अजास्त्री ३) सर्वसाधारण वार्ड क्रमांक ६)-( तीन जागा)- १)सर्वसाधारण स्त्री.२) सर्वसाधारण. ३) नामप्र. एकूण ६ वार्ड असलेल्या फोंडाघाट ग्रामपंचायत मध्ये १७ सदस्य संख्या आहे. या आरक्षणामुळे प्रस्थापितांना धक्का बसला असून त्यांना अन्य वार्ड शोधावे लागणार आहेत.
यावेळी सरपंच संतोष आग्रे, उपसरपंच सुदेश लाड, तलाठी अरुणा जयानावर,विश्वनाथ जाधव, सायली तेली, प्रीतम भोगले, मिथील (पिंटू) सावंत, विजय फाँडेकर, तन्वी मोदी, दर्शना पेडणेकर, ध्रुव गोसावी, राजन चीके, राजन नांचे ,सुभाष सावंत, पांडू राणे आणि ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते…