*कोकण Express*
*शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर ईडीचा छापा…*
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची धाड पडली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचं पथक काही वेळापूर्वीच संजय राऊतांच्या मुंबईतील घरी सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेसह दाखल झालं आहे.
ईडीनं यापूर्वी संजय राऊत यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती. मात्र संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं कारण देत संजय राऊत यांनी चौकशीला जाणं टाळलं होतं. त्यामुळे आता ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरी पोहोचले आहेत.सकाळी सातच्या सुमारास ईडीचे अधिकारी राऊतांच्या बंगल्यावर पोहोचले. संजय राऊत भांडूपमध्ये राहतात. ईडीचे अधिकारी राऊत यांच्या घरी दाखल झाले,
त्यावेळी संजय राऊत, त्यांच्या पत्नी वर्षा राऊत, बंधू सुनिल राऊत घरात होते. सध्या ईडीचे अधिकारी राऊतांच्या घराची झाडाझडती घेत आहेत. राऊत यांच्या घरावर छापा पडल्याची माहिती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना समजताच शिवसैनिक मोठ्या संख्येनं राऊत यांच्या घराबाहेर जमले. त्यांनी ईडी आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.