सावंतवाडीत मनसे मध्यवर्ती कार्यालयात कै.अरुण लक्ष्‍मण सावंत यांचा आठवा स्मृतीदिन साजरा

सावंतवाडीत मनसे मध्यवर्ती कार्यालयात कै.अरुण लक्ष्‍मण सावंत यांचा आठवा स्मृतीदिन साजरा

*कोकण Express*

*सावंतवाडीत मनसे मध्यवर्ती कार्यालयात कै.अरुण लक्ष्‍मण सावंत यांचा आठवा स्मृतीदिन साजरा*

आज मनसेच्या सावंतवाडी शहर मध्यवर्ती कार्यालय येथे कै. अरुण लक्ष्मण सावंत यांचा आठवा स्मृतिदिन करण्यात आला. मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थित मध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत श्रद्यंजली वाहण्यात आली. यावेळी उपरकर यांनी कै.अरुण सावंत यांच्या आठवणीना उजाळा दिला.कै. सावंत यांचा जनमाणसात आदर्श व्यक्तिमत्व आसा ठसा होता. बाळासाहेब यांचे कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती.ज्याठिकाणी अन्याय दिसेल त्या ठिकाणी न्याय देण्याकरिता पुढाकार असे. माझे व त्यांच कौटुंबिक व जिव्हाळ्याचे संबंध होते. माझे ते अत्यंत जवळचे सहकारी होते व राहतील असे मा आमदार श्री उपरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्ये त्यांनी उपजिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना चांगल्या प्रकारचे कामे केले. व पक्ष वाढीस मोलाचे सहकार्य केले असे श्री उपरकर म्हणाले यावेळी. सावंतवाडी शहरअध्यक्ष आशिष सुभेदार, उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, कौस्तुभ नाईक राजेश टंगसाळी लक्ष्मीकांत हरमलकर अभय देसाई बंटी मठकर गोविंद मोरिये आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!