सावंतवाडी नगरपालिकेचे नगरसेवक पदासाठीचे आरक्षण जाहीर

सावंतवाडी नगरपालिकेचे नगरसेवक पदासाठीचे आरक्षण जाहीर

*कोकण Express*

*सावंतवाडी नगरपालिकेचे नगरसेवक पदासाठीचे आरक्षण जाहीर*

*प्रभाग ९ अनुसूचित जातीसाठी; एक, दोन, चार व दहा नामाप्र महिलांसाठी राखीव…*

*सावंतवाडी  ः प्रतिनीधी*

येथील नगरपालिकेसाठी आज नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यात प्रभाग क्रमांक ९ अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक १,२,४ व १० हा नागरिकांचा मागासवर्ग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच प्रभाग क्रमांक ५ हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. ही सोडत प्रक्रिया आज येथील पालिकेच्या सभागृहात प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर आणि मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या उपस्थितीत पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!