*कोकण Express*
*सावंतवाडी पं. स. आरक्षण सोडत जाहीर*
*मळगाव अनुसूचित स्त्री साठी तर इन्सुली व सातार्डा मागास प्रवर्गासाठी आरक्षित*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडी पंचायत समिती सदस्य पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यात मळगाव पंचायत समिती मतदार संघ अनुसूचित जाती स्त्री जागेसाठी तर इन्सुली व सातार्डा मतदारसंघ नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. तर कोलगाव, न्हावेली ओबीसी महिलांसाठी राखीव झाले आहेत.