*कोकण Express*
*कोलगाव शाळा नंबर ३ मध्ये शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप*
*पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वाढदिवसानिमित्त कोलगाव शिवसेनेचा उपक्रम*
*सावंतवाडी प्रतिनिधी*
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमीत्त कोल गाव शाळा क्रमांक तीन येथे कोलगाव शिवसेनेकडून महीला तालुका प्रमुख अपर्णा को ठावळे यांच्या सहकार्याने मुलांना खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना महीला तालुका प्रमुख अपर्णा कोठावळे माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य शिवदत्त घोगळे माजी सरपंच महीला उपतालुका प्रमुख मारिया डिमेलो उपविभाग प्रमुख तथा माजी सरपंच संदीप गवस ग्रामपंचायत सदस्य रेश्मा करमळकर प्रशांत कोठावळे आदी उपस्थित होते ह्यावेळी बोलताना अपर्णा कोठावळे यांनी विद्यार्थ्यांना बाळासाहेब ठाकरे उध्वव ठाकरे यांच्या कार्याची माहीती दिली व शिवसेना ऐशी टक्के समाज कारण व विस टक्के राजकारण करते असे सांगीतले ह्यावेळी शिवदत्त घोगळे व संदीप गवस यांनी ही मार्गदर्शन केले ह्यावेळी शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकही उपस्थित होते.