*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच वर्षात दुग्ध क्रांतीची नवी पहाट उजाडेल*
*जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे प्रतिपादन*
*तीन हजार म्हशींच्या माध्यमातून दिवसाला एक लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट*
*कलंबिस्त येथे कृषी व पशुसंवर्धन मेळावा संपन्न*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय पशुसंवर्धन कुक्कुटपालन मेंढीपालन असे शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून एक नवी विकासाची क्रांती घडवायची आहे. यासाठी जिल्हा बँकेने दुधाळ गाईम्हैशींसाठी कर्ज योजना सुरू केली आहे. दोन कोटी चे कर्ज वितरित करण्याचा संकल्प आहे. या माध्यमातून जवळपास ३ हजारहून अधिक म्हैशी या
जिल्ह्यात आणून दिवसाला एक लाख लिटर दूध संकलन करण्याचे उद्दिष्ट आहे. येत्या पाच वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध क्रांतीची नवी पहाट उजडेल असे काम करायचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी यांनी केले.
दरम्यान, याची सुरुवात सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यात करण्यात येत असून या ठिकाणी वर्षभरात पाचशे लिटर दूध संकलित कसे होईल या दृष्टीने काम केले जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक व सैनिक नागरी सहकारी पतसंस्था व सह्याद्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कलंबिस्त ग्रामपंचायत येथे आयोजित पशुसंवर्धन व कृषी तसेच दुग्ध जनावरांना कर्ज वाटप योजना उपक्रम मेळाव्यात उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या मेळाव्याचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर, तज्ञ मार्गदर्शक डॉ. प्रसाद देवधर, सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचे सीईओ सुनील राऊळ, चेअरमन शिवराम जोशी, सरपंच शरद नाईक, शिरशिंगे उपसरपंच पांडुरंग राऊळ, उपसरपंच सुभाष राऊळ, नारायण राऊळ, कॅप्टन दीनानाथ सावंत, कॅप्टन सुभाष सावंत, सह्याद्री फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रल्हाद तावडे, कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध संस्थेचे चेअरमन ॲड. संतोष सावंत, वेर्ले दुग्ध संस्थेचे चेअरमन श्री लिंगवत, शंकर राऊळ, जिल्हा बँकेचे सांगेली शाखा व्यवस्थापक बोडके, सांगेली दुग्ध संस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, सोसायटीचे उपाध्यक्ष अंतोन रोड्रिक्स, सैनिक स्कूलचे दीपक राऊत, प्रताप परब, शिरशिंगे दुग्ध संस्थेचे चेअरमन देसाई, सागर तांबेकर, विकास सोसायटीचे संचालक लवु भिंगारे, कृषी सहाय्यक सौ. राऊळ, गजानन राऊळ, अशोक राऊळ, गणपत राणे, सुनील सावंत, राजेश पास्ते, अनिल राऊळ, सिद्धेश सावंत आदी उपस्थित होते.
पशुसंवर्धन विकासासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून दोन कोटी कर्ज वितरित करण्याचा संकल्प आहे. आतापर्यंत सव्वा कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. तीन हजार म्हैशींची खरेदी या माध्यमातून करायची असून तरुणांना एक नवा उद्योग व्यवसाय उभारून त्यांना विकासाच्या पर्वामध्ये आणायचे आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार लिटर दूध संकलन होत आहे. हे दूध संकलन एक लाख लिटर पर्यंत कसे जाईल या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत येत्या पाच वर्षात हे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त पंचक्रोशीत दुग्ध क्रांती घडेल या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दुधाळ जनावरांसाठी कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायाविषयी तज्ञ मार्गदर्शक डॉ. प्रसाद देवधर म्हणाले, ही पंचकोशी सैनिकी परंपरेची आहे. तुम्ही देश सेवा करून आला आहात आता गावाच्या विकासासाठी आणि गावाच्या सेवेसाठी कार्यरत रहा. यासाठी तुमच्या तरुण मुलांना गाई म्हशी आणि शेती उद्योग व्यवसायाकडे वळवा जर तुमच्या घरी जर एक गाय असेल तर तुम्ही आरोग्य आणि मानसिक व आर्थिक दृष्ट्या सधन झाला आहात असे निश्चित समजा दूध धंद्याकडे साधन म्हणून बघा संकरित गाई म्हैसी च्या माध्यमातून तुम्ही या भागात एक दुग्ध क्रांती आणि समृद्धी घराघरात कशी येईल या दृष्टीने प्रयत्न करा गावागावात जर दारू मिळणे सोपे झाले असेल तर मग दूध संकलित का होत नाही याचे आत्मचिंतन आपणच करायला हवे खरंतर सावंतवाडी शहराला हजार लिटर दूध दर दिवशी आवश्यक लागते जर आपण शहरालगतच्या गावाने ही दूध क्रांती घडून आणली तर आपल्याच भागात एक नवा प्रकल्प उभा राहील आणि यातून नवा विकासाला गती येईल, असे डॉ. देवधर यांनी स्पष्ट केले.
जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवण्यात आले आहेत त्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा आणि यातून एक नवी विकासाची गती प्राप्त करावी आणि कृषी आणि पशुसंवर्धन मध्ये तरुणाने उतरावे यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर यांनी स्पष्ट केले.
तर जिल्हा बँकेच्या माध्यमातून आतापर्यंत कधी गावागावात बँक आली नव्हती परंतु आम्ही कारभार हाती घेतल्यापासून आणि चेअरमन दळवी यांच्या माध्यमातून आता तुमच्या दारी बँक आली आहे या बँकेच्या माध्यमातून दूध जनावरे खरेदीसाठी कर्ज योजना अमलात आणली आहे यामध्ये अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. या भागात जवळपास ५० हून अधिक शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले जाईल असे सुनील राऊळ यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी या पंचक्रोशीतील शेतकरी दीपक राऊळ विठ्ठल राऊळ पांडुरंग लाड मनाजी धोंड एकनाथ राऊळ अंकुश घा डी अशोक राऊळ आदि ना कर्ज वाटप करण्यात आले यावेळी कलंबिस् त येतील दुग्ध शेतकरी यांचे पाल्य इयत्ता दहावीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या विद्याथ्यांचा गौरवही करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.