*कोकण Express*
*खारेपाटन महाविद्यलयाचाया रा. से. यो. कक्षाकडून हर घर तिरंगा – एक अभिनव उपक्रम असा संदेश*
जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाकडून हर घर तिरंगा उपक्रमाला उत्साहपूर्ण लोकसहभाग मिळावा म्हणून रॅली, पथनाट्य व मेळावा घेऊन जनजागृती करण्यात आली.
भारत सरकार, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य व विभागीय सहसंचालक उच्च विभाग, कोकण विभाग, पनवेल आणि राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, मुंबई विद्यापीठ यांच्यकडून मिळालेल्या निर्देशनानुसार खारेपाटण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या स्वयंसेवकांनी हर घर तिरंगा उपक्रमाला प्रचंड मोठ्या संख्येने लोकसहभाग मिळावा या मुख्य उद्देशाने महाविद्यालयीन दत्तक गांव केळवलीत रॅली, पथनाट्य व मेळाव्याचे आयोजन करून जनजागृती केली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, आजादी का अमृत महोत्सव, 75 years Independent या निमित्त ‘हर घर तिरंगा’ हा अभिनव उपक्रम संपूर्ण देशात राबविला जाणार आहे. या केळवली गावाच्या धरतीवर आपल्यामधील असलेले राष्ट्रप्रेम जागृत करण्याचे काम या अभियानाअंतर्गत करणार असून जास्तीत जास्त घरांवर तिरंगा फडकविला जाणे ही अभिमानास्पद बाब असेल. असे पथनाट्याच्या माध्यमातून संदेश देण्यात आले.
महाराष्ट्रातील प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढावी या हेतूने केंद्र शासनामार्फत हर घर तिरंगा अभियान राबविण्या येत आहे तसेच भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांना ही एक मानवंदना असे या जनजागृतीतून सांगण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्याला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात स्वातंत्र्याच्या आठवणी उजळून निघाव्यात तसेच स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात यासाठी हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे. या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत 13 ते 15 दरम्यान झेंडा फडकविण्याचे आहे असे ही या मेळाव्यात सांगण्यात आले.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाबाबत केळवली गांवातील सर्व राहात्या घरांवर राष्ट्रध्वज लावण्याचे नियोजन केळवली ग्रामपंचयतद्वारे करण्यात आलेले आहे या बाबत जागृत करण्यात आले. ध्वजारोहणा बाबतचे नियमा बाबत राष्ट्रीय सेवा योजना कक्ष सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक व कार्यक्रम अधिकारी श्री.वसीम सय्यद यांनी जनजागृती केली.
या प्रसंगी केळवलीचे प्रशासक श्री.बळवंत हुलगुंडे, विस्तार अधिकारी, पंचायत समिती राजापूर, केळवलीच्या ग्राम विकास अधिकारी श्रीमती वंदना तळवडेकर, माजी सरपंच श्री.प्रभाकर हर्याण, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.विठोबा हर्याण, श्री.संदीप हर्याण आदी 40 केळवली गांवातील ग्रामस्थ उपस्थित होते.
या जनजागृतीत अदिती भालेकर, साक्षी भालेकर, सिध्दी राणे, मयूरी पवार, प्राजक्ता गाडे, अमृता जगताप, आरती पवार, रेणुका मोरे, मयूर मोरे, चेतन मांजरेकर, जिग्नेश वारंगे, पृथ्वीक सावंत, पुष्पसेन निग्रे, यश राऊत, हेमंत पवार, अपूर्व कोवळे राष्ट्रीय सेवा योजना कक्ष स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला.
या पथनाट्याचे दिग्दर्शन विद्यार्थी प्रतिनिधी भक्ती पिसे व गुरुनाथ भोसले यांनी व्यक्त केले.