*कोकण Express*
*शिवसैनिकांच्या माध्यमातून शिवसेनेचे हात बळकट करण्याचे काम सुरू ; हरी खोबरेकर*
*शिवसेना सदस्य नोंदणीला मालवणात उत्स्फूर्त प्रतिसाद*
*मालवण ः प्रतिनीधी*
तालुका शिवसेनेच्या वतीने आजपासून सुरू केलेल्या शिवसेना सदस्य नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे नेतृत्व घेतल्यापासून शिवसेना ताकदीने वाढली आहे. शिवसैनिकांच्या माध्यमातून शिवसेनेचे हात बळकट करण्याचे काम सुरू आहे. येणाऱ्या काळात ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सर्व शिवसैनिक मोठ्या ताकदीने काम करू हा संदेश देणारी ही सदस्य नोंदणी आहे असे मत शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी स्पष्ट केले.
शिवसेना सदस्य नोंदणीचा शुभारंभ आज येथील शिवसेना शाखेत करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख बाबी जोगी, गणेश कुडाळकर, मंदार केणी, यतीन खोत, नरेश हुले, महेंद्र म्हाडगुत, महेश जावकर, सन्मेष परब, बंड्या सरमळकर, सेजल परब, दीपा शिंदे, तृप्ती मयेकर, शीला गिरकर, नंदा सारंग, आकांक्षा शिरपुटे, रश्मी परुळेकर, पॉली गिरकर, सुरेश मडये यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. खोबरेकर म्हणाले, शिवसेनेच्या वतीने प्राथमिक पद्धतीने सदस्य नोंदणीची सुरुवात केली होती. आज सर्व नगरसेवक, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, शाखाप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, नितीन वाळके यांच्या नेतृत्वाखाली महेश कांदळगावकर, मंदार केणी, यतीन खोत, गणेश कुडाळकर, बाबी जोगी, श्वेता सावंत, पूनम चव्हाण, सेजल परब, दीपा शिंदे या सर्वांच्या सहकार्याने संपूर्ण शहरात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे काम येत्या दोन दिवसात केले जाणार आहे.
उद्यापासून शहरातील प्रत्येक प्रभागात सदस्य नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. शहरातील प्रभागात सदस्य नोंदणीच्या कामास सर्व शिवसैनिक लागले आहेत. शहरात ज्या व्यक्ती शिवसेनेचे सदस्य होऊ इच्छितात त्यांनी शिवसेना सदस्य नोंदणीचा अर्ज भरून अधिकृतरित्या शिवसेनेचे सदस्य व्हावे. शिवसेनेवर आजपर्यंत जसे प्रेम दाखविले तेच प्रेम येणाऱ्या काळातही तुम्ही दाखवाल असा आपल्याला विश्वास असल्याचे श्री. खोबरेकर यांनी स्पष्ट केले.