*कोकण Express*
*वैभववाडी तालुक्यात 100 पदाधिकारी देणार पक्षनिष्ठा प्रतिज्ञापत्र*
*तालुक्यात 2 हजार नूतन सभासद नोंदणी करणार*
*तालुकाप्रमुख मंगेश लोके यांची माहिती*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
वैभववाडी तालुक्यात शिवसेनेच्या 100 प्रमुख पदाधिकाऱ्यांची पक्षनिष्ठा प्रतिज्ञापत्र घेण्यास सुरुवात केली असून 2 हजार नवीन पक्ष सभासद नोंदणीला सुरुवात केली असल्याची माहिती तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी दिली. यामध्ये तालुकाप्रमुख, उपतालुकप्रमुख, विभाग, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, बूथ प्रमुख, गट प्रमुख, महिला आघाडी, युवा सेना पदाधिकारी पक्षनिष्ठा प्रतिज्ञापत्र 27 जुलै रोजी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिनी सादर करण्यात येणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी दिली.