*कोकण Express*
*नांदगाव आरोग्य केंद्र अंतर्गत या आठवड्यात ९ रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह*
*राहिलेल्या नागरिकांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे*
*वैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता तपसे यांचे आवाहन*
*नांदगाव ः प्रतिनिधी*
कणकवली तालूक्यातील नांदगाव आरोग्य केंद्र अंतर्गत कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण संख्या या आठवड्यात ९ आढळून आले आहे .यामुळे रुग्ण मिळाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा कोरोना तपासणी केली जात आहे. व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहे. नांदगाव येथील कोरोना पॉझीटीव्ह संख्या ३ वर पोहचली आहे. तर नांदगाव आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या गावात बेळणे,असलदे येथे ही रुग्ण आढळले असून आरोग्य केंद्र अंतर्गत एकूण रुग्ण संख्या ९ वर पोहचली आहे. यामुळे येथील नागरिकांनी सतर्क राहावे पावसाचे दिवस असून सर्दी खोकला ताप लक्षणे दिसू लागताच न घाबरता नजिकच्या आरोग्य केंद्र येथे तपासणी करून घ्यावी . तसेच दररोज कोरोना लसीकरण उपलब्ध असून राहीलेल्या नागरीकांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे व सरकारने बुस्टर डोसचा कालावधी 9 महिन्यावरून 6 महिने केला आहे तरी सर्व नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावेत हे सर्व डोस नांदगाव आरोग्य केंद्र येथे उपलब्ध असल्याचे नांदगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ दत्ता तपसे यांनी बोलताना सांगितले आहे.यावेळी नव्याने दाखल झालेले वैद्यकीय अधिकारी डॉ अक्षय अडसूळ उपस्थित होते.