*कोकण Express*
*कुडाळातील गरजू मुलांसाठी हिंद मराठा महासंघाकडुन शालेय वस्तूचे वाटप….*
*विशाल परबांकडून कार्यक्रमाचे आयोजन; माजी खासदार निलेश राणेंची प्रमुख उपस्थिती…*
*कुडाळ ः प्रतिनीधी*
हिंद मराठा महासंघाच्यावतीने कुडाळ तालुक्यातील मुलांना जिल्हाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम गुरूवार २८ जुलैला माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती हायस्कुुलमध्ये होणार आहे. यावेळी माजी खासदार तथा भाजपाचे युवा नेते निलेश राणे उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्व गरजू विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विशाल परब यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.