शिवसेना ठाकरेंचीच,ठाकरे ब्रँड कोणीही संपवू शकत नाही-आ. वैभव नाईक

शिवसेना ठाकरेंचीच,ठाकरे ब्रँड कोणीही संपवू शकत नाही-आ. वैभव नाईक

*कोकण Express*

*शिवसेना ठाकरेंचीच,ठाकरे ब्रँड कोणीही संपवू शकत नाही-आ. वैभव नाईक*

*ओरोस, कसाल, आंब्रड जि. प. मतदारसंघाची बैठक संपन्न*

*ओरोस ः प्रतिनीधी*

कोणीही कितीही वल्गना केल्या तरी शिवसेना हि ठाकरेंचीच आहे. कटकारस्थान करून केंद्रीय यंत्रणांचा वापर करून तुम्ही शिवसेनेची धनुष्यबाण निशाणी काढून घ्याल परंतू ठाकरे नावाचा ब्रँड कोणीही संपवू शकत नाही. भाजपने राज्याची सत्ता कशा पद्धतीने मिळविली हे जनतेला कळून चुकले आहे. ईडी,सीबीआय या यंत्रणांचा पद्धतशीरपणे वापर करून भाजपने शिवसेना संपविण्याचा डाव आखला आहे. हे राज्यातील जनता विसरणार नाही. मला देखील आमिषे देण्यात आली होती. मात्र त्याचा मी स्वीकार केला नाही. ज्या पक्षाने आपल्याला मोठे केले त्या पक्षाशी गद्दारी करणे योग्य नाही. असा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आमदार, खासदार गेले असले तरी शिवसैनिक हे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत कायम आहेत.शिवसेना अडचणीत असताना जो सोबत राहतो तोच निष्ठावंत शिवसैनिक आहे.असे आमदार वैभव नाईक म्हणाले आहेत.

 

आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी ओरोस जिल्हा परिषद मतदारसंघाची बैठक वेताळबांबर्डे येथे, कसाल जी. प. मतदार संघाची बैठक कसाल कार्लेवाडी येथे, आंब्रड जि. प. मतदार संघाची बैठक कुपवडे येथे संपन्न झाली. या बैठकांना शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना पक्ष संघटना वाढी संदर्भात शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

 

याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, माजी जि. प.गटनेते नागेंद्र परब, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत,माजी उपसभापती जयभारत पालव, तालुकाप्रमुख राजन नाईक, रुपेश पावसकर, उपतालुकाप्रमुख महेश सावंत, उपतालुकाप्रमुख बाळू पालव, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, महिला तालुकाप्रमुख स्नेहा दळवी,ओरोस विभागप्रमुख नागेश ओरोसकर, आंब्रड विभागप्रमुख विकास राऊळ, आंब्रड सरपंच विठ्ठल तेली, सोनवडे सरपंच उत्तम बांदेकर,भरणी उपसरपंच निशांत तेरसे, घोटगे उपसरपंच गीतेश सावंत,पोखरण सरपंच सौ. कदम, अवधूत मालणकर, छोटू पारकर, परशुराम परब, बाळा कांदळकर,कसाल विभाग प्रमुख सचिन कदम, विभाग संघटक संदीप सावंत, प्रवीण भोगटे, डॉ. बालम, अमित भोगले,अरुण राणे, योगेश तावडे, पप्पू पालव, सोशल मीडिया जिल्हा समन्वयक अनुराग सावंत, राजेश घाडीगावकर, गणेश मेस्त्री, सुशील परब, सीमा मुंज, रवी कदम, सुनील जाधव,पी. डी. सावंत, तेजस भोगले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!