*कोकण Express*
*ग्रंथालय कर्मचा-यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँके कडून पगारतारण ओव्हरड्राफ्ट सुविधा योजना मंजूर:मनिष दळवी*
*सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी)*
जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानीत ग्रंथालयामध्ये काम करीत असलेल्या कर्मचा-यांचे वेतन हे शासनाकडून दिले जाते. मात्र हे वेतन दरमहा वेळीच जमा होत नाही. अनेक वेळा सदर अनुदान सहा महीन्यांनी जमा होते अशा कर्मचा-याना आर्थिक अडचण निर्माण होते व ते बँकेकडे कर्जाची मागणी करतात त्यासाठी त्यांना पगारतारण ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्द करून दिल्यास त्याची होणारी आर्थिक अडचण दुर होण्यास मदत होणार असल्याचे जिल्हा बँक अध्यश मनिष दळवी यांनी सांगीतले. जिल्ह्यातील ज्या ग्रंथालय कर्मचा-यांचे पगार जिल्हा बँकेच्या ज्या शाखेत जमा होतात तेच या योजनेस पात्र रहातील.सदर ओव्हरड्राफ्ट खाते पगार जमा होत असलेल्या शाखेकडे राहील.सदर खाते सुरू असेपर्यंत ईतर ठिकाणी वेतन वर्ग करता येणार नाही.त्यासाठी हमीपत्र घेतले जाईल. ओव्हरड्राफ्ट कर्जाची कमाल मर्यादा एकुण मासीक पगाराच्या २५पट व जास्तीत जास्त रू.५०,०००/-पर्यंत राहील.सदर कर्जाचा कालावधी हा १ वर्षाचा असुन कर्ज मंजूरी ५वर्षासाठी किंवा सेवा निवृत्ती यापैकी कमी कालावधीसाठी एकदाच मंजूर केले जाईल. कर्ज नुतनीकरणासाठी विनंती अर्ज शाखेकडे वेळीच सादर केला पाहीजे. सदर कर्ज सुविधा हि पगाराच्या तारणावर असल्याने सदर कर्मचा-यांना मिळणारा पगार सदर ओव्हरड्राफ्ट कर्ज खाती जमा करण्यात येईल कर्मचारी ओव्हरड्राफ्ट कर्ज खात्यातून रू५०,०००/- मर्यादेपर्यंत उचल करू शकेल.सदर कर्जाचा व्याजदर ९.५०टक्के राहील.तर बँकेत पगार जमा होणारा पगारदार नोकर जामीन राहील.सदर खात्यासाठी स्वतंत्र एटीएम कार्डची आवश्यकता असणार नाही.कर्मचा-याकडून विहीत नमुन्यातील अर्ज प्राप्त झाल्यावर एटीएम कार्ड सदर खात्यास लिंक करण्यात येईल. या योजनेचा जिल्ह्यातील ग्रंथालय कर्मचा-यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा बँक अध्यश मनिष दळवी यांनी केले आहे.