*कोकण Express*
*नाधवडे येथील ओम हनुमंत नारकर यांची बेंगलोर येथे २१ वर्षे वयोगटातील राज्यस्तरीय फुटबाॅल संघांत निवड झाल्याबद्दल अभिनंदन*
*कासार्डे:संजय भोसले*
वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावात नेहमीच समाजसेवेत सतत पुढे असणारे समाजसेवक ,उद्योजक हनुमंत नारकर यांचे सुपुञ ओम हनुमंत नारकर याची बेंगलोर येथे अंडर २१ वयोगटातील राज्यस्तरीय फुटबाॅल संघांत नुकतीच निवड झाली आहे.यामुळे त्याचे वैभववाडी तालुक्यात सर्वञ अभिनंदन केले जात आहे.
नाधवडे गावात नेहमीच नवनवीन कलाकार,विविध खेळात खेळाडू तयार होत आहेत.यात कु.ओम नारकर यांचा रुपाने एक नवा हिरा सापडला आहे.ओम याला लहान पणापासुन फुटबाॅल खेळाची खुप आवड होती.तो सध्या मुंबई स्थित असुन बोरीवली येते राहतो.तो मुंबईतील फुटबाॅल संघातुन सराव करत होता.
गेले दोन दिवसापुर्वीच त्यांची राज्यस्तरीय फुटबाॅल अंडर २१ वयोगटातील बेंगलोर संघातुन निवड झाली.
नाधवडे गावातील प्रतिष्टितांच्या वतीने ओमचा बोरीवली येथे अभिनंदन व पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी औदुंबर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर नारकर ,बाबा खाडेकर ,संतोष टक्के ,हनुमंत नारकर,रुपेश कुडतरकर ,दिपक पावस्कर ,दिपक कुडतरकर,योगेश शेट्ये,प्रफुल्ल घाडी, संतोष सावंत,वांदरकर ,केशव नारकर, किशोर नारकर ,योगेश घाडी ,निरज तानवडे आदी मान्यवर मोठ्या संखेने उपस्तित होते.