औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे ( गावठण ) च्या वतीने अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालय, नाधवडे या विद्यालयातील सर्व विध्यार्थांना मोफत गणवेश वाटप

औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे ( गावठण ) च्या वतीने अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालय, नाधवडे या विद्यालयातील सर्व विध्यार्थांना मोफत गणवेश वाटप

*कोकण Express*

*औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे ( गावठण ) च्या वतीने अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालय, नाधवडे या विद्यालयातील सर्व विध्यार्थांना मोफत गणवेश वाटप*

*कासार्डे : संजय भोसले*

नाधवडे गावात सामाजिक,शैक्षणिक कामात कार्यरत असणारी प पु प्रभाकर नारकर प्रणित औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे ( गावठण ) च्या वतीने अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालय, नाधवडे येथे सर्व विध्यार्थांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.

 

नाधवडे गावात सतत सामाजिक,शैक्षणिक कामात कार्यरत असणारी प पु प्रभाकर नारकर प्रणित औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे ( गावठण ) ही नेहमी समाज उपयोगी कार्य करत असते.

 

याच ट्रस्टच्या वतीने अरविंद सावंत सरदार माध्यमिक विध्यालय नाधवडे येथे सर्व विध्यार्थांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले..याच ट्रस्टच्या वतीने या दोन महीन्यात गावातील सर्व विध्यार्थांना वर्षभर पुरतील एवढ्या वह्या वाटप,स्वाध्याय पुस्तिका वाटप,गावातील मंदिरे ,शाळा,स्मशाणभुमी याठिकाणी वृक्ष लागवड तसेच संविता आश्रम कुडाळ येथील अनाथ लोकांना अन्नधान्न व नवीन कपडे वाटप करण्यात आले होते.आज संपन्न झालेल्या गणवेश वाटप प्रसंगी वैभववाडी माजी सभापती बाप्पी मांजरेकर ,सोसायटी चेअरमन बबन कुडतरकर , माजी जि.प.सदस्य सुधिर नकाशे,जिल्हा शांतता कमिटी सदस्य परशुराम इस्वलकर ,शं.सेवा सोसायटी उपाध्यक्ष संतोष पेडणेकर,बाळा पावस्कर ,माजी तंटामुक्ती अध्यक्ष रमाकांत पांचाळ, औदुबर सेवा ट्रस्टचे उपाध्यक्ष प्रल्हाद कुडतरकर ,हायस्कुल चे मुख्याध्यापक डी.एस.पाटील,सर्व शिक्षक वर्ग आणि पालक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!