*कोकण Express*
*गोठोस मध्ये पिसाळलेल्या कुत्र्याची मोठी दहशत,चावा घेत असल्याने घबराट चार जनावरे दगावली…*
*ग्रामपंचायतीने त्या कुत्र्याचा तात्काळ बंदोबस्त करावा समस्त ग्रामस्थांची मागणी..*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
तालुक्यातील गोठोस गावांमध्ये पंधरा दिवसापूर्वी मोकाट फीरणाऱ्या कुत्र्याने रात्रीचा शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये जाऊन जनावरांचा चावा घेतल्याने चार जनावरे दगावली आहेत.
ग्रामपंचायतीने त्या कुत्रांचा तात्काळ बंदोबस्त करण्यासाठी मोहीम राबविण्यात यावी अशी ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.
मोकाट फिरणाऱ्या कुत्र्याचा ग्रामस्थांना तसेच शाळेतील मुलांना रस्त्यावरून ये जा करताना भीतीचे छायेखाली ग्रामस्थ वावरताना दिसत आहेत
ग्रामपंचायत विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे मात्र ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.