*कोकण Express*
*जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीमंत चव्हाण यांची बदली मॅट कडून रद्द*
*सिंधुदुर्ग:*
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीमंत चव्हाण यांची तडकाफडकी झालेली बदली ही औटघटकेची ठरली आहे. डॉक्टर चव्हाण यांनी या बदलीच्या निर्णयाविरोधात मॅटमध्ये धाव घेतली होती. या सुनावणीदरम्यान विनंती बदली नसतानाही विनंती बदली दाखविण्यात आल्याच्या मुद्द्यावर डॉक्टर चव्हाण यांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला होता. तसेच डॉक्टर चव्हाण यांच्या विरोधात तक्रारी असल्यामुळे बदली केल्याचे सांगण्यात आले होते. मात्र मॅटमध्ये बदली ही तक्रारीमुळे मग विनंती बदली चा आदेश कसा असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यानंतर अखेर ही बदली रद्द करण्यात आली. डॉक्टर श्रीमंत चव्हाण यांनीही या वृत्ताला दुजोरा देत न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली. त्यामुळे गेले काही दिवस जिल्हा रुग्णालयात शल्यचिकित्सक पदाच्या खुर्चीचा चाललेला खेळ तूर्तास तरी थांबला आहे.