*कोकण Express*
*शिवसेना सावंतवाडी विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत व महिला तालुका प्रमुख अपर्णा कोठावळे यांच्या कडून विद्यार्थिनीला शैक्षणिक वाटचालीस सहकार्य*
*सावंतवाडी: प्रतिनिधी*
वेर्ले येथील होतकरू विद्यार्थिनी कु . प्रांजल सत्यवान लिंगवत ही दहावीत ९१%, गुण घेऊन उत्तीर्ण झाली . तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शिवसेना विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत व महिला शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख अपर्णा कोठावळे यांनी सहकार्याचा हात पुढे केला . शिवसेना सावंतवाडी शाखेत प्रांजली हिला हे सहकार्य करण्यात आले .या विद्यार्थिनीची आई सौ . शितल लिंगवत या आशाताई आहेत . कोरोना काळात त्यांनी जीवावर उदार होऊन उत्कृष्ट कार्य केले आहे .
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार , महिला तालुका प्रमुख अपर्णा कोठावळे, उपतालुका प्रमुख राजू शेटकर , महिला शहर प्रमुख श्रुतिका दळवी , सुनिता राऊळ उपस्थित होते . यावेळी अपर्णा कोठावळे यांनी शिवसेना नेहमीच होतकरू मुलांच्या पाठीशी उभी राहील असे सांगितले .