*कोकण Express*
*कला फोटो स्टुडिओचे मालक सुभाष काळसेकर यांचे निधन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शहरातील जुन्या पिढीतील फोटोग्राफर व येथील कला फोटो स्टुडिओचे मालक सुभाष पांडुरंग काळसेकर (६४) यांचे मंगळवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. गेली ४५ वर्ष ते फोटोग्राफीच्या व्यवसायात होते. शहरातील प्रसिद्ध फोटोग्राफर म्हणून त्यांची ओळख होती. आपला व्यवसाय सांभाळत ते तेली समाजाच्या विविध समाजोपयोगी उपक्रमात सहभागी असत. त्यांनी काही काळ तरुण भारतचे प्रेस फोटोग्राफर म्हणूनही काम केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली, सून, भाऊ, बहिणी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.