*कोकण Express*
*राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाचा तळेरे येथे जल्लोष ; भाजपकडून चौकात घोषणाबाजी…!*
*कणकवली ः प्रतिनीधी*
भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू या विजयी झाल्या बद्दल व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तळेरे भाजपाच्या वतीने आज चौकात फटाके फोडत जल्लोष साजरा केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून ओबीसींना आरक्षण मिळाल्याबद्दलही सरकारचे आभार यावेळी व्यक्त करण्यात आले. या जल्लोषाप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष संतोष कानडे, माज पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर तसेच भाजप पदाधिकारी उपस्थित होते.