*कोकण Express*
*दहावी पुनर्मुल्यांकनात पाट हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी. देविका गिरीधर पडते सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम*
मार्च 2021- 22 मध्ये घेण्यात आलेल्या[ एस.एस.सी] माध्यमिक शालांत परीक्षेत एस एल देसाई पाट विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी. देविका गिरीधर पडते हिने 498/500 99.60% गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मराठी विषयाचे पुनर्मूल्यांकन केल्यामुळे तिला 89 गुणांऐवजी 97 गुण प्राप्त झाले आहेत.
तिने मिळविलेल्या या कौतुकास्पद यशाबद्दल एस. के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित एस्.एल्. देसाई विद्यालय पाट व कै. सौ. सीताबाई रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालय आणि कै. डॉक्टर विलासराव देसाई कला, वाणिज्य व विज्ञान उच्च महाविद्यालयातर्फे श्री .सामंत दिगंबर(उपाध्यक्ष)श्री .समाधान परब(कार्याध्यक्ष)श्री .सुधीर ठाकूर .कार्यवाह आणि सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री कोरे सर. पर्यवेक्षक श्री.हंजनकर सर सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.वामन तर्फे,सचिव श्री. गुरुदास कुसगांवकर यांनी तिचे अभिनंदन व कौतुक केले आहे. कुमारी. देविका गिरिधर पडते हिने एस.एस.सी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून एस्. एल्. देसाई विद्यालयाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे.