*कोकण Express*
*शिरवंडे हायस्कूल येथे लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ निवडणूक संपन्न*
विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून लोकशाही मुल्ये अवगत होऊन लोकशाही शासन पद्धतीची माहिती मिळावी,प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया समजावी आणि अनुभवता यावी या उद्देशाने त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे ता. मालवण या प्रशालेत शालेय मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रिया गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात आली. या उपक्रमात विद्यार्थ्यांना उमेदवार म्हणून नावे देणे, प्रचार करणे मतदान करणे, मतमोजणी करणे याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे या संपूर्ण प्रक्रियेत सहभाग घेतला. एकूण 12पदासाठी 39उमेदवार रिंगणात होते. यात पुढीलप्रमाणे उमेदवार निवडून आले. मुख्यमंत्री-कु.वेदांत पंडित कासले,उपमुख्यमंत्री-कु.चैतन्य चंद्रकांत गांवकर, सहलमंत्री-कु.सानिया महेश तांबे, सुशोभणमंत्री-कु.अनिश अरुण गांवकर, वनमंत्री-ओम रामचंद्र पाताडे, पर्यावरणमंत्री-ईशान अनिल गांवकर, अर्थमंत्री-रोहन संतोष शेळके, शिस्तमंत्री-कोमल भालचंद्र जंगले, क्रीडामंत्री-अविष्कार केदू शेळके, आरोग्यमंत्री-साक्षी उमेश सर्पे, सांस्कृतिकमंत्री- समृद्धी मोतीराम दुखंडे सचिव-मयुरी मंगेश गांवकर
निवडणूक अधिकारी म्हणून श्री. सावंत एस आर, श्री. काणेकर व्ही डी. श्री. आनंद मालणकर(सामाजिक कार्यकर्ते) यांनी काम पाहिले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल श्री. सावंत एस् आर आणि श्री. काणेकर व्ही डी यांचे मुख्याध्यापक श्री. वामन तर्फे यांनी विशेष आभार मानले आणि विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.