कट्टा येथे वर्षावास कार्यक्रमाचे उद्घाटन

कट्टा येथे वर्षावास कार्यक्रमाचे उद्घाटन

*कोकण Express*

*कट्टा येथे वर्षावास कार्यक्रमाचे उद्घाटन*

*मालवण  ः प्रतिनीधी*

भारतीय बौद्ध महासभा मालवण तालुका शाखेच्या संस्कार विभागातर्फे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे वर्षावास कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी तालुकाध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी वर्षावासाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले.

याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम, तालुकाध्यक्ष सूर्यकांत कदम, मालवण संस्कार विभाग उपाध्यक्ष प्रकाश पवार, कोषाध्यक्ष संजय पेंडुरकर, सरचिटणीस रविकांत कदम, संरक्षण विभागाचे मिलिंद पवार, जिल्हा हिशोब तपासणीस शिवप्रसाद चौकेकर, तालुका हिशोब तपासणीस शंकर कदम, पर्यटन विभाग सचिव विनायक वराडकर, शामसुंदर वराडकर, शशिकांत पवार, योगेश वराडकर व गाव शाखेचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, महिला मंडळ उपासक, उपासिका आदी कार्यक्रमास उपस्थित होते. सूत्रसंचालन संस्कार विभाग सचिव नचिकेत पवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!