*कोकण Express*
*ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा….*
*दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे आदेश…*
*मुंबई,ता.२०:*
ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आरक्षणासह येत्या दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा, अशा सूचना सुप्रीम कोर्टाने दिल्या आहेत.बाटीया आयोगाच्या अहवालानुसार हे आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना २७% पर्यंत आरक्षण मिळणार आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसींना आता राजकीय आरक्षण पुन्हा मिळणार आहे. मात्र ज्या ठिकाणी ओबीसींची संख्या कमी असेल त्या ठिकाणी पुन्हा सर्वेक्षण होणार आहे.