कणकवली तालुक्यातील सरपंचांचे स्नेहसंमेलन राज्यासाठी आदर्शवत!

कणकवली तालुक्यातील सरपंचांचे स्नेहसंमेलन राज्यासाठी आदर्शवत!

*कोकण Express*

*कणकवली तालुक्यातील सरपंचांचे स्नेहसंमेलन राज्यासाठी आदर्शवत!*

*उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांचे प्रतिपादन*

*सरपंचांच्या विविध कलागुणांनी आली स्नेहसंमेलनात रंगत*

*कणकवली ः प्रतिनीधी*

आपल्याला मिळालेली पदे ही काही कालखंडापूरती असतात. मात्र माणूस म्हणून, आपण माणूसकी जपून सबंध कायम जपले पाहीजेत.आपण आज सरपंच परिवार म्हणून एकत्र येत जे स्नेहसंमेलनाचे आयोजन केलात हे जिल्हासह राज्यासाठी सरपंचाना अनुकरणीय आहे.असे उद्गार जि.प.सिंधुदुर्ग उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यानी बेळणे येथिल आशिष मंगल कार्यालयात काढले. कणकवलीत सर्वपक्षीय सरंपचच्या वतीने आयोजित केलेल्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर जि.प.उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) विशाल तनपूरे, कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,जि.प.विस्तार अधिकारी महादेव शिंगाडे,पं.स.विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग,रामचंद्र शिंदे याच्यासह कणकवली तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व कुटंबिय उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळ सत्रात स्नेहसंमेलनाचा शुभारंभ करण्यात आला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम,स्पर्धांचा शुभारंभ या प्रसंगी करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना श्री.ठाकूर म्हणाले की,आज आपण पाच वर्षे संरपंच राहीलो या पाच वर्षातील पुढील चार महिने शिल्लक आहेत.यामध्ये आपण कोणते काम केले, लोकांची काय गरज होती, यासाठी आपण समाधानी आहात का? याचे सिंहावलोकन करुन याचा विचार करणे गरजेचे आहे.कारण आपल्याकडून राहीलेली कामे पुढील चार महिन्यात पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.तसेच आपले गाव राळेगणसिद्धी,पाटोदा सारखे होण्यासाठी प्रयत्न करा. असे सांगत पुढील वाटचालीस व कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.यावेळी विशाल तनपूरे म्हणाले,आपण लोकनियुक्त सरंपच आहात यामुळे आपली जबाबदारीही तेवढी मोठी होती. ती आपण समर्थपणे पार पाडलात.आपल्या काळात मागच्या शंभर वर्षात नतंर आलेल्या कोरोना सारख्या महामारीत आपण सरंपच म्हणून जे काम करत असताना जी जनतेची सेवा केलात ते तुमचे भाग्य आहे.आपण गावचा विकास करताना चांगली कामे घडतील असे काम करत रहा असे सांगत शुभेच्छा दिल्या.गटविकास अधिकारी अरुण चव्हाण म्हणाले, जिल्हातील सरंपच संघटनापैकी कणकवली तालुका सरपंच संघटनेने आज सरपंच परिवार म्हणून एकत्र येत स्नेहसंमेलन आयोजित केले हा नविन पायंडा पडला असून, जिल्हातील सरपंच परिवाराचा पाहीला मेळावा कणकवली तालुक्याने अयोजित केला. ओटव सरपंच हेमंत परुळेकर,शेर्पे सरंपचा निशा गुरव यांनी सरपंचाच्या वतीने मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवारांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत करण्यात आले. यावेळी झालेल्या संगीत खुर्ची स्पर्धेत महिला सरपंचा मधून नांदगाव सरपंचा आफ्रोजा नावलेकर तर पुरुष सरपंचा मधून बिडवाडी सरपंच सुदाम तेली यानी क्रमांक पटकाविला.तर दिवसभर विविध सांस्कृतिक व कला गुणांना वाव देणारे कार्यक्रम तालुक्यातील सरंपचांनी सादर कार्यक्रमात रंगत वाढवली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचलन वाघेरी सरंपच संतोष राणे व आभार करुळ संरपच कर्णिक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!